Password Security Tips Cyber Security | पासवर्ड सेक्युरिटी टिप्स इन मराठी


Password Security Tips  

पासवर्ड सेक्युरिटी टिप्स इन मराठी  

Cyber Security Training & Awareness Thane


password security tips in marathi

Change your Password in Every 10 Days Be Alert , Be Safe on Online www.suyashcomputers.co.in


आपण आज आपला पासवर्ड कसा सुरक्षित ठेवावा किंवा स्ट्रॉंग पासवर्ड कसा बनवावा या विषयावर माहिती घेणार आहोत. आपण सर्वजण पासवर्ड विषयी खूपच गंभीर असतो. पासवर्ड ला इंग्लिश मध्ये "केस सेन्सिटिव्ह" म्हटलं जातं म्हणजे जसा आहे तसा पासवर्ड तुम्हाला लिहावा लागतो म्हणजे जर आपला पासवर्ड अप्पर केस आणि लोअर केस असा मिक्स पासवर्ड असेल तर आपल्याला जसा आपला पासवर्ड आहे तसाच लिहावा लागेल नाहीतर सिस्टम स्वीकारणार नाही.
आज आपण पासवर्ड कसा असावा यावर माहिती घेणार आहोत.खालील काही मुद्दे आपण लक्षात ठेवले तर आपला पासवर्ड खूपच सुरक्षित राहू शकतो.

१) पासवर्ड निवडताना पासवर्ड हा अतिशय स्ट्रॉंग असला पाहिजे. आपण पासवर्ड ला तीन प्रकारे विभागतो

अ) वीक पासवर्ड
ब) मिडीयम पासवर्ड
क) स्ट्रॉंग पासवर्ड 


वीक पासवर्ड पासवर्ड निवडताना आपण खूपच काही करतो त्यामुळे आपण आपला मोबाईल नंबर, गॅस कनेक्शन नंबर, प्रिय व्यक्तीचे नाव, गाडीचा नंबर, आईचे नाव, वडिलांचे नाव, मुलीचे व मुलाचे नाव, जन्मतारीख, असा ठेवतो पण त्यामुळे हॅकर्स ला तो पासवर्ड शोधणे सोपे होते.

उदाहरणार्थ:

  • १२३४५६७
  • Password
  • Welcome
  • Mysweety
  • Abcd
  • Xyz

या सर्व पासवर्ड ला आपण विक पासवर्ड असे समजतो.

मिडीयम पासवर्ड : मध्ये आपण काही वस्तूंची नावे व काही नंबर्स ॲड करत असतो.

उदारणार्थ: 
  • पासपोर्ट नंबर
  • पॅन कार्ड नंबर
  • आधार कार्ड नंबर
  • इतर अजून काही अल्फा न्यू मरिक शब्द.

अशा पासवर्डचा अंदाज लावून सुद्धा हे पासवर्ड crack होऊ शकतात.

स्ट्रॉंग पासवर्ड : अशा पद्धतीच्या पासवर्डमध्ये आपण शब्द, संख्या, स्पेशल कॅरेक्टर्स, स्पेशल सिम्बॉल्स, अप्पर केस, लोअर केस चा उपयोग करतो.
स्ट्रॉंग पासवर्ड बनवताना आपण किमान सोळा अक्षरांचा पासवर्ड बनवला पाहिजे.

उदाहरणार्थ:
MyHome@604!Kalyan
Earning$500$inAmerica

पासवर्ड नक्की स्ट्रॉंग असावा पण तो आपल्या लक्षात राहील असा असावा.

आपल्याला पासवर्ड स्ट्रॉंग बनवण्याकरिता आम्ही खाली काही वेबसाइट्स दिल्या आहेत त्याचा उपयोग करून आपण आपला पासवर्ड स्ट्रॉंग बनवू शकता

1) www.Passwordsgenerator.net
2) www.Lastpass.com
3) www.1password.com/password-generator/

वरील कोणत्याही एका वेबसाईटवर जाऊन आपण आपला पासवर्ड आपल्याला हवा तसा बनवू शकतो.

२) कोणत्याही वेबसाईटमध्ये किंवा एप्लीकेशन मध्ये जर आपण एखादा पासवर्ड वापरला असेल तर तसाच पासवर्ड दुसऱ्या वेबसाईटवर किंवा एप्लीकेशन वर वापरू नये.

उदाहरणार्थ: जो पासवर्ड आपण आपल्या ईमेल आयडीला वापरला असेल तोच पासवर्ड किंवा तशाच स्वरूपाचा पासवर्ड फेसबुकवर वापरू नये किंवा अन्य कोणत्याही वेबसाईटवर वापरू नये.

३) कोणत्याही वेबसाईटवर जर two-step व्हरिफिकेशन ची सुविधा असेल तर आपण नक्की त्याचा लाभ घ्यावा. यामुळे आपला पासवर्ड कोणी हॅक करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आपल्या अकाऊंटमध्ये एक्सेस घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्याला वन टाइम पासवर्ड (OTP) त्या वेबसाइट किंवा ॲप्लिकेशन कडून येतो. तरी आपण आपला ओटीपी (OTP) म्हणजेच वन टाइम पासवर्ड कधीही कोणाशी शेअर करू नये.

४) आपण कम्प्युटर मोबाईल किंवा टॅब वापरत असाल तर त्यामध्ये आपण अपडेटेड वर्जन म्हणजेच अपडेट सॉफ्टवेअर चा वापर करत आहोत याची खात्री करून घ्यावी. आपण जर जुनी किंवा आऊटडेटेड सॉफ्टवेअर वर्जन वापरले तर ते आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरला हवी तशी सुरक्षा देत नाहीत.

५) आपण मोबाईल मध्ये ॲप इन्स्टॉल करताना आपण काय परमिशन देतोय याचे थोडे भान ठेवले पाहिजे. कारण अशा काही ॲप्स मधून आपल्या ला आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मधून आपली काही वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते.

६) फिशिंग साइट्स म्हणजेच हुबेहूब दिसणाऱ्या वेबसाइट्स यांच्याकडे लक्ष द्यावे.

७) आपण आपला पासवर्ड कुठेही लिहून न ठेवता तो आपण स्वतः लक्षात ठेवला पाहिजे.


वरील सर्व मुद्दे जर आपण काळजीपूर्वक हाताळले तर आपला पासवर्ड क्रॅक (हॅक) होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो.

आपल्याला जर माहिती उपयोगी वाटली असेल तर आपण नक्की शेअर करावे

सायबर सिक्युरिटी तज्ञ  श्री धर्मेंद्र नलावडे 

Contact : +919821214643
WhatsApp No: +919821214643
वेबसाईट : www.suyashcomputers.co.in
Facebook page : https://www.facebook.com/sctsthane/
YouTube Channel: https://www.youtube.com/channel/UCdCiHN4CzDnVdMGiGpGrgQA
Blog : https://cybersecuritymarathi.blogspot.com/


#CyberSecurity #cybersecure #Dharmendra_Nalawade #Cyberexpert #Cyber_Security_Training_Thane
#Cyber_security_Professional #Cyber_Security_Awareness


password security tips 
password security best practices
strong password examples
password tips from hackers
how to improve password security
password security measures
how to keep your password safe
password security articles


Comments

Popular posts from this blog

How to protect your page from getting hacked in Marathi